मंगळवार, २९ जानेवारी, २०१३

दोष न माझा झाले नास्तिक जरी -


 .
========================
--- दोष न माझा झाले  नास्तिक जरी --
========================
देव नसतोच मुळी 
ती  आहे श्रद्धा खुळी

देवत्व  यायला टाकीचे घाव सोसावे 
माणुसकी यायला काय  बरे करावे 

  सूर्यदेवाने  व्यापले आकाश 
 अर्ध्य दिल्याने मावळलाय कधी सावकाश 

मंदिरात याच्यापुढे लाडू पेढ्याची रास
देतोय का भुकेल्यांना एकतरी घास

नवनाथाची पारायणे करा 
अनाथानो रस्त्यावर मरा
 
वेद ,वचने,अभंग ,प्रवचने करा कीर्तने 
अठराविश्वे दारिद्र्यात सुखाने नांदणे 

अनंते ठेविले तसेची राहावे 
चोरी ,वाटमारी मुकाट पाहावे 

देवा करितो तुजसाठी  एकादशी 
कर्जबाजारी होऊन घेतो फाशी 

देवा पावशील नवसाला कावडीत आणली गंगा 
चेंगरा चेंगरीत ठार , तुझ्याच नवसाच्या रांगा

 भक्त   तुझ्या  ओढीने  दरवर्षी पायी करतो शेकडो मैलाची वारी 
यंदाही दर्शन नाही,अभिषेकास बैसली मुख्यमंत्र्यांची स्वारी 

किती गुणगान गावे तुझे अस्तिकापरी 
न फुटला पाझर तुजला दोष न माझा  झाले नास्तिक जरी 
          --मनिषा 


किरदारों को निभाने में वक्त जाया न करो 
बुझ दिलो की तरह यूँ  खुद को छुपाया न करो 

यहमियत रखो सपनो की ,सपनो को यूँ  जाया न करो 
बेबस होगा तेरा जश्न ,यूँ महफिले सजाया न करो 

काफिले पे कितने मगरूर थे तुम ,काफिला  यूँ पीछे छोड़ आया न करो
समंदर में ढुंढ़ो  निशाँ अपने , खोज में नहर का पानी यूँ ही बहाया न करो 
  

---निशाँ
-- 

मंगळवार, २२ जानेवारी, २०१३

अभंग


अभंग 
कडू  निंब खावा   | रोग चुकवावा
गुण ओळखावा | औषधिक

धोत्र्याच्या फुलात | विष जातिवंत 
सन्मान   पूजेत | शंकराच्या   

नदीचा हा पूर  | नेई दूर दूर
 निर्माल्याचा थर | गावातील 

असतील शिते | जमतील भुते 
सदा पात्र रिते | नाठाळाचे 

करून देखावा   | करी भक्त धावा 
विठ्ठल स्मरावा  | मनातील

करावा  विचार    |तन  हे नश्वर 
पुजावा ईश्वर | क्षणभर 

 -मनिषा  बेळगे