कविता -आर्जव
असंख्य आर्जवा नि नभास भेदले असावे
आर्त साद घालशील मनी ताडले असावे
विरह नित्याचीच गाथा ,भेट परिपाठ घेते
तु दुरस्थ बरी , जणू भाळी गोंदले असावे
जरी मुठीत बंदिस्त केले जीर्ण कल्पित
एकाकीपणा बहाल करीत निसटले असावे
गायले भुपाळी दशदिशा पादाक्रांत केल्या
तूर्तास बसली वाचा , गुपित जाणले असावे
वादळाशी ग सख्य माझे ,गर्वाने उडाले
क्रूर चेष्टेत त्याने पंखच छाटले असावे
मनिषा बांगर -बेळगे