मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१३

पहिल्यांदाच मला बुद्धी प्रामाण्य पत्र हाताशी लागले आहे … मनीषा तुझे खूप आभार.हल्ली असे कुणी लिहित नाही - लोकांना आवडेल का? रुचेल का? असे लोकानुनय करणारे प्रश्न मनात उभे राहतात. मळलेली पायवाट सोडून नवीन पायवाट रुजवायचा हा प्रयत्न … खूप वाचा

नमस्ते ,सदरील लिखाण माझ्या मनावरील कोरीव शिल्प आहे .सत्य् घटनेवर आधारित आहे.

प्रिय ,

सदसदविवेकबुद्धी
खूप दिवसाचे तुझ्याविषयी लिहीन म्हणतेय ,सारखे आज उद्या करत होते. आजकाल तू कुठे दिसत नाही .
या भूतलावरून अगदीच गायब होण्या आधी तुझ्याविषयी दोन शब्द लिहीन म्हणतेय तुझी ओळख झाली तेंव्हा मी साधारण १० वर्षाची होते.इयत्ता ४ थी त शिकत असेन ,बालभारती मध्ये एक धडा होता "सद्सद्विवेकबुद्धी" या धड्याचा लेखक मात्र आठवत नाही. हा शब्द पहिल्यांदा उच्चारला आणि खूपच आवडून गेला.१० वेळा न बघता लिहून काढला. भारीच वाटला . त्याचा अर्थ धड्याच्या खाली शब्दार्थ मध्ये दिला होता खरा
पण मला काही रुचला नाही .किंवा समजला नाही. म्हंटले अजून एखाद्या मास्तराना विचारावे. साधारण हि सद्सद्विवेकबुद्धी कशाशी खातात.त्यांनी हि थातूर मातुर सांगून बोळवण केली.
आईने म्हंटले मोठी झालीस कि समजेल. वडिलांनी हि त्यांच्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
वडिलांनी थेट महाभारतातील उदाहरण दिले " अश्व्थाम्याच्या मृत्युच्या बातमीने द्रोणाचार्य साशंक झाले खरे ,पण सत्यवचनी युधिष्ठर ने अश्वत्थामा (हत्ती )मेला अशी ग्वाही दिल्यानंतर त्यांची सद्सद्विवेकबुद्धी सुप्त झाली , आणि ते पुत्र वियोगात शोकाकुल झाले.
त्यावेळी महाभारत समजण्याइतपत वय नव्हते .कृष्ण एकमेव पात्र माहित होते .
एका मैत्रिणीने ती अक्कलदाढ असावी असे सुचवले .पण मनाने ठाव घेतला तू काहीतरी खूपच अप्रतिम गोष्ट आहेस. आपल्याला जर मिळालीस तर काय होईल.
काहीही करून मिळवायचीच ,विचाराने कित्येक दिवस स्वस्थ बसू दिले नाही.
एकदिवस धीर करून वडिलांना म्हंटले ,मला आणि माझ्या भावाला खाजगी शिकवणी ची गरज आहे.
अजून कुणी जाणकार भेटेल हि माफक अपेक्षा ठेवून ठरल्याप्रमाणे एका मास्तरांकडे आम्ही शिकण्यास जाउ लागलो.
गणित,विज्ञान यातील जरा बरेचसे ज्ञान बघून मास्तर बोलले, तुला कोणता विषय अवघड जात आहे . आपण फक्त तोच घेत जाऊ ,मी तत्काळ "मराठी" असे उत्तर दिले. मला तर आयतीच संधीच मिळाली होती.तुझ्याविषयीची जिज्ञासा अस्वस्थ करत होती.
कधी एकदा विचारीन असे झाले होते. शेवटी एक दिवस मास्तरांवर प्रश्नाची सरबत्ती सुरु केली . … ती अशी …
१ )सद्सद्विवेकबुद्धी वयाच्या कितव्या वर्षी येते ?
२)अक्कलदाढेला पर्याय असते कि अक्कलदाढ येणे म्हणजेच सद्सद्विवेकबुद्धी येणे ?३ ) तिचा कुठे कुठे उपयोग होतो. ? ४ ) ती लवकर येण्यास काही उपाय आहेत का ? ५ ) ती जर आपल्यात नसेल तर काय होऊ शकते ? माझ्या बाळबोध(खत्रूड ) प्रश्नांनी मास्तर चक्रावले . उद्या सांगतो म्हणून पाठवणी केली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच वारीकाकरवी सांगावा धाढला.तुमच्या कन्येला खाजगी शिकवणीची मुळीच गरज नाही.ती जात्याच हुशार आहे. मात्र तिच्या छोट्या भावाला नियमित पाठवा.
झाले... घोडे गंगेत न्हाले काय आणि कोरडेच राहिले काय सारखेच … सगळे प्रश्न अनुत्तरीत राहिले… . कालंतराने मी विसरून गेली.
स्वतःचे विचार आणि सद्सद्विवेकबुद्धी जागृत होण्यास बराच काळ जावा लागला . पुढे पदवीचे शिक्षण घेत असताना ,तुझी पुन्हा आठवण झाली खरी … पण माझ्या प्रश्नाची उत्तरे काळाने मला आपोआप दिली होती.
सद्सद्विवेकबुद्धी म्हणजे कुठल्याही गोष्टीविषयी ती योग्य आहे कि अयोग्य याची असलेली जाणीव. तू शाबूत असलीस कि मनुष्य पापकर्म करत नाही .
स्वच्छेने कर्म करण्याचा अधिकार फक्त विवेकी मनुष्यास आहे ,कारण त्याच्याठायी conscious mind (सद्सद्विवेकबुद्धी) आहे.
आजच्या परिस्थितीत तुझा अभाव प्रत्येक ठिकाणी जाणवतो. ... तुझ्यात बरीचशी गुपिते सामावलेली आहेत.ती मी कायम नोट करून ठेवलीत. हाच माझा अमुल्य ठेवा आहे.
प्राचीन काळापासून सशक्त व्यक्तित्व (शील) याला अतिशय महत्वाचे मानले गेले आहे. माणसाकडे षट संपत्ती असायला पाहिजे :
साम ( मनाचा शांतपणा आणि गंभीरपणा)
दाम (स्वयंवर नियंत्रण आणि स्वतःच्या वासनांवर नियंत्रण)
उपरती (तृप्तता)
तितिक्षा (सहनशक्ती)
श्रद्धा (विश्वास)
समाधान (संयमशीलता किंवा केंद्रित मन)
हे सहा गुण असल्याशिवाय, मनुष्य मुमुक्षु (ज्याला मोक्ष किंवा मुक्ती पाहिजे) बनू शकत नाही. आणि जोपर्यंत मनुष्य मुमुक्षु बनत नाही तोपर्यंत त्याला ज्ञान प्रदान केल्या जात नाही.
म्हणूनच माणसाकडे विवेक (चांगल्या आणि वाईट यामधील फरक कळण्याची समज), वैराग्य(उदासीनता), आणि षट संपत्ती हे असतील तर तो मुमुक्षु बनतो. म्हणूनच भगवान बुद्ध म्हणाले की शील,समाधान ,संयमशीलता आणि प्रज्ञा (दैवी ज्ञान) हे मनुष्यामध्ये उपस्थित असले पाहिजे.
मनुष्य मध्ये अहिंसा,शील गुण असले पाहिजे. त्याला समाधी, ध्यान अवस्थेचा(meditation) अनुभव असायला हवा. तेव्हाच तो प्रज्ञावान म्हणजेच ज्ञान आणि सद्सद्विवेकबुद्धी या ईश्वरीय देणग्या असलेला मनुष्य बनू शकतो.
मनाची स्पष्टता नसणे आणि तणाव यामुळे अधर्म होतो . जेव्हा मन केंद्रित नसते आणि हृदयात सल असते तेव्हा अधर्म होतो.म्हणून ज्ञान आणि सद्बुद्धी हे तुम्हाला धर्माच्या मार्गाला घेऊन जातात .
तू आत्मा आणि भौतिक शरीर यांचा समन्वय साधतेस , त्यामुळेच भगवद्गीतेत म्हटले आहे ,
| नास्ती बुद्धीरयुक्तस्य नचायुक्तस्य भावना |,
| नचाभावयत: शांती: अशांतस्य कुत: सुखम् |

"जर तुमचे स्वत:चे चित्त तुमच्या आत्म्याशी स्थिर झालेले नसेल तर ना तुमच्या बुद्धीला धार येईल नां तुम्हाला भावनिक स्थैर्य आणि स्पष्टता येईल."


संपूर्णम
पुन्हा तुला लिहीनच
प्रिय भारतीय न्यायदेवता ,

तू लोकशाहीचा एक स्तंभ आहेस ,तुझ्या शिवाय लोकशाही अपूर्ण आहे. डोळ्यावर पट्टी बांधून पुरावे ,साक्षी याचा पडताळणी करूनच तू निर्णय देतेस सदरील निर्णय अनेकदा पटणारे नसतात. तरीही आम्ही तुझ्या सर्व महत्वपूर्ण निर्णयांचे स्वागत करत असतो. कारण १०० गुन्हेगार सुटले तरी चालतील एक निरपराधाला शिक्षा नको. याची तू काळजी घेत असतेस .

अशातच आलेल्या एका निर्णयाचे स्वागत .... लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये फेरफार करण्याची मागणी निवडणूक आयोगाने अनेकदा केली होती. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी या बदलांना विरोध केला होता. लिली थॉमस आणि लोक प्रहरी या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या अर्जावर गुन्हेगार लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.हा निर्णय सदोष असला तरी स्वागतार्ह आहे. भारतीय लोकशाही मध्ये असा महत्त्वपूर्ण निर्णय काही प्रमाणत का होत नाही देशातील गुनेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकप्रतिनिधी साठी चपराक आहे.या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही चांगल्या लोप्रतीनिधीवर अन्याय होऊ शकतो,त्यासाठी असे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून तातडीने निकाली काढावे. याशिवाय आणखी एक निर्णय उत्तरप्रदेशमधील उच्च न्यायालयाने दिला जातीय मेळाव्यांवर बंदी घालण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत आहे.मध्यंतरी उत्तरप्रदेश च्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी " ब्राम्हण भाईचारा" या संमेलनाची सुरवात केली होती.या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशमधील वकील मोतीलाल यादव यांनी थेट उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती.त्यात यश मिळाले . इतर राज्यांनी हि यावरून धडा घ्यावा घाणरडे जातीय राजकारण बंद करावे. एकतर भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असताना तुम्ही निवडणुकाही जातीवर आधारित घेणार आहात?

तुला दोन शब्द लिहिण्याचा हेतू हाच कि आणखी असे बरेचसे निर्णय येऊ देत.मनापसून स्वागत होईल.

पुन्हा लिहीनच ….

एक अनिवासी भारतीय नागरिक
प्रिय भारतीय न्यायदेवता ,

तू लोकशाहीचा एक स्तंभ आहेस ,तुझ्या शिवाय लोकशाही अपूर्ण आहे. डोळ्यावर पट्टी बांधून पुरावे ,साक्षी याचा पडताळणी करूनच तू निर्णय देतेस सदरील निर्णय अनेकदा पटणारे नसतात. तरीही आम्ही तुझ्या सर्व महत्वपूर्ण निर्णयांचे स्वागत करत असतो. कारण १०० गुन्हेगार सुटले तरी चालतील एक निरपराधाला शिक्षा नको. याची तू काळजी घेत असतेस .

अशातच आलेल्या एका निर्णयाचे स्वागत .... लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये फेरफार करण्याची मागणी निवडणूक आयोगाने अनेकदा केली होती. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी या बदलांना विरोध केला होता. लिली थॉमस आणि लोक प्रहरी या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या अर्जावर गुन्हेगार लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.हा निर्णय सदोष असला तरी स्वागतार्ह आहे. भारतीय लोकशाही मध्ये असा महत्त्वपूर्ण निर्णय काही प्रमाणत का होत नाही देशातील गुनेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकप्रतिनिधी साठी चपराक आहे.या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही चांगल्या लोप्रतीनिधीवर अन्याय होऊ शकतो,त्यासाठी असे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून तातडीने निकाली काढावे. याशिवाय आणखी एक निर्णय उत्तरप्रदेशमधील उच्च न्यायालयाने दिला जातीय मेळाव्यांवर बंदी घालण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत आहे.मध्यंतरी उत्तरप्रदेश च्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी " ब्राम्हण भाईचारा" या संमेलनाची सुरवात केली होती.या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशमधील वकील मोतीलाल यादव यांनी थेट उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती.त्यात यश मिळाले . इतर राज्यांनी हि यावरून धडा घ्यावा घाणरडे जातीय राजकारण बंद करावे. एकतर भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असताना तुम्ही निवडणुकाही जातीवर आधारित घेणार आहात?

तुला दोन शब्द लिहिण्याचा हेतू हाच कि आणखी असे बरेचसे निर्णय येऊ देत.मनापसून स्वागत होईल.

पुन्हा लिहीनच ….

एक अनिवासी भारतीय नागरिक
मनीषा बेळगे ह्यांनी एक मस्त पत्र पोस्ट केले आहे ...खासच...काही गोष्टी खूप सोप्प्या असतात..पण त्यांचे व्यावसायिक मूल्य खूप थोड्या व्यक्तींच्या ध्यानात येते...मनीषा बेळगे ह्या दुबई मध्ये आपल्या व्यावसायिक संस्थेच्या कार्यकारी संचालक आहेत....त्यामुळे ह्या पत्राला विशेष महत्व .....

प्रिय नेहा ,
मी च्चक पत्र लिहायला लागले आहे...अग कारण हि तसेच...,

तू मागे एकदा आधुनिक राहणीमान विषयी अगदी भरभरून बोलत होती, म्हंटले तुला एक गंमत सांगावी.

सध्या आधुनिकतेचे युग आहे. आधुनिकता म्हंटली कि त्यात प्रामुख्याने उंची राहणीमान उंची कपडे इतर जीवनावश्यक आणि निरुपयोगी गोष्टी आल्याच.
यात प्रत्येक बाबीमध्ये फ़ैशनच प्रभाव दिसतो . जणू आधुनिकता आणि फ़ैशन ह्या सख्या बहिणी आहेत. परवा मी एक साडी घेतली म्हंटला चला फैशन मध्ये आहे. हॉट एटेम आहे. सिने सृष्टीतील एक ड्रेस डिजाईनर मसाबा गुप्ता(नीना गुप्ता ची कन्या ) ने ह्या साडीचा शोध लावला. २ वेगवेगळ्या रंगाचे तुकडे घ्यायचे एकत्र जोडायचे झाली कि तयार डिजाईनर साडी. शिल्पा शेट्टी , सोह आली खान ,सोनम कपूर या सिनेअभिनेत्री तिच्या या साड्या आवर्जून नेसत आहेत. म्हणून मलाही मोह आवरता आला नाही , मी साडी नेसून बघितल्यावर मला साक्षात्कार झाला कि अगदी हुबेहूब असेच डिजाईनर साडी आपण लहान असताना बघितली होती .जरा भूतकाळात जाऊन बघितले , गावी सुट्ट्यात गेली कि काही बायकांच्या अंगावर आपण असा दोन रंगाचे जोडून घरीच तयार केलेले नऊवारी साडी बघितली होती .

काहीतरी अजब शोध लागल्याची चमक माझ्या डोळ्यात आली. अनेकांकडे त्याला काय नाव असावे अशी चौकशी केली असता,त्यावेळच्या या फैशन चे नाव " जुनेर असे होते. पूर्वीच्या काळी स्रियांचे खर्च कमी असत,वर्षाकाठी २ साड्या त्याही घरातील कर्त्या पुरुषानेच आणायच्या आणि त्याच जपून वापरायच्या जर खराब झाल्याच तर खराब झालेला भाग काढून चांगल्या भागाचे तुकडे एकत्र जोडून अशी साडी तयार करून बायका पुन्हा तीच साडी आवडीने न कुरकुरता घालत असत.

नेहा ,सांगायचा मुद्दा हाच कि तशीच हुबेहूब साडी जर जुन्या काळी वापरत असत तर जुन्या काळी सुद्धा आधुनिक राहणीमान असावे का ?तशी काही फैशन असावी काय ? मला तसे सविस्तर लिही.

एक मात्र खरे जुन्या काळातील कपड्यांचे डिजाईन मध्ये थोडाफार बदल करून ह्या तुझ्या माझ्या आधुनिक जगात अमुक फैशन तमुक फैशन नावाने मिरवत आहे.
~~~~~~~~~~~~
तूर्तास थांबते -पुन्हा लिहीनच
तुझी मैत्रीण

रविवारच्या मेजवानीत मनीषा बेळगे ह्यांचे "खाईन तुपाशी" हे सदर ...लज्जतदार ....पहिल्यांदाच "न लिहिलेली पत्रे" मध्ये ....


प्रिय आई,
साष्टांग दंडवत असेच लिहितात मोठ्यांना तूच सांगितले होते. 
आई आज मुद्दामच तुला पत्र लिहितेय .तू म्हणायचीस तू आजकाल लिहिणे सोडलेस काय ? लिहित रहा ,नाहीतर मराठी बोलण्या बरोबर ,मराठी लिहिणे हि विसरून जाशील. तेच तुला सांगतेय असे कधी होऊ शकते.
बोलणे किंवा लिखाण्याच्या बाबतीत विसराळू होऊ शकतो कि नाही ते माहित नाही ,पण खाद्य पदार्थांच्या बाबतीत मात्र होऊ शकते. तू बनवायचीस असे कितीतरी खाद्य पदार्थ मी करायला घेते आणि एखादी स्टेप विसरते.मग फार विचार करूनही आठवत नाही.मग त्यातून एखादा नवीन पदार्थ जन्मास येतो.आता तू म्हणशील हे तर चांगलेच आहे.
मी शोध लावलेल्या पदार्थाचे पेटंट करण्याआधीच तो पदार्थ कुठेतरी उपलब्ध असतो. काहीच कळत नाही , त्याची शोधकर्ता मी ते तत्सम हॉटेल.
नौकरी निम्मित जेंव्हा एखद्या परक्या देशात वास्तव्यास राहून तेथील संस्कृतीशी तेथील राहणीमान ,खाद्य संस्कृती ,कायदे व्यवस्था या सर्वाशी जमवून घेणे कधीच सोपे नसते . ज्यांना जमते ते टिकतात ,अन्यथा मायदेशी परततात.
मला अजूनही आठवते तू माझ्या आखाती देशात जाण्याच्या विरोधात होतीस.
पण बाबा म्हंटले अशी संधी सगळ्यांना मिळत नाही. " अनुभव घेतल्याशिवाय अनुभव व्यक्त करता येत नाहीत " जाऊ दे तिला ,नवीन काही शिकेल आणि तिच्या निम्मिताने आपणही शिकूच.
एकदाचा तू होकार दिला होतास तेही भल्या मोठ्या सूचना सह … एकतर आपण शाकाहारी आणि तू जातेस तिथे मांसाहार केला जातो. वाळवंटी प्रदेश असल्याने भाजीपाला पिकत नसेल.तू काही झाले तरी मांसाहार करायचा नाहीस आपली संस्कृती जपायची आपल्यापुरते का होत नाहीत सणवार साजरे करायचे. मुख्य सूचना म्हणजे पैसे जास्त खर्च करायचे नाही. (तशी मी खूप खर्चिक आहे असे तिचा गैरसमज आहे तो बहुतेक सगळ्याच आयांचा असावा ) पैशाचे मोल समजले पाहिजे जास्त जरी पैसा मिळाला तरी उधळपट्टी अजिबात करायची नाही.अशा एक न दोन हजार सूचना.
अगदी तुझा शब्द न शब्द स्मरणात आहे. तुझी फार आठवण येते.असा एकही क्षण गेला नाही कि ,तुझी आणि बाबांची आठवन आली नाही.
खरे सांगायचे म्हणजे दुबई मध्ये येण्यापूर्वी ज्या भ्रामक कल्पना होत्या त्या सगळ्या पुसल्या गेल्यात ,आपण जसे चित्र निर्माण केले होते ,त्या अगदी विरुद्ध असे वास्तव आहे.मी इथे बऱ्यापैकी रुळ्लेय. येथील संस्कृतीशी जुळवून घेणे सुरवातीला खूप जड गेले. येथील गंमती जमती,खाद्य संस्कृती मी तुला पत्राने कळवायचे असे ठरलेय. मी तुला नित्य पत्रे लिहित जाईल. आजच्या पत्रात मी तुला अरेबिक लोकांचा एक खास पदार्थ सांगणार आहे. त्याचे नाव " फलाफील " आहे . काळजी नको , तो शाकाहरी आहे.
गंमत म्हणजे गेल्या संक्रातीला मी अरेबिक पदार्थांची थीम ठेवली होती ,आणि विशेष म्हणजे कोणाची हि मदत न घेता मी एकटीने अरेबिक वेज पदार्थ बनवून खाऊ घातले ,माझ्या मैत्रिणी अगदी अचंबित झाल्या होत्या. मी बनवलेल्या पदार्थांमध्ये हमुस , ताहीना ,बसबुशा (स्वीट ), बाबा गनुश (मुत्तबल),फलाफील, खुबुस(पिता ब्रेड) (अरेबिक रोटी ) हे होते . आज मी फलाफील कसे बनवायचे याची रेसिपी देते ,तू नक्की बनवून बघ अन मला कळव कसे बनले होते.खूप सोपे आहे .
फलाफील हे सर्व आखाती देशात स्टार्टर म्हणून खाल्ले जाते.पिता ब्रेड मध्ये सलाड सोबत तहीना पेस्ट टाकून रोल बनवून दिले जाते.
यासाठी लागणारी सामग्री -- १कप रात्रभर भिजून ठेवलेले काबुली चणे ,१ कांदा बारीक कापून ,५ ते ६ लसुन पाकळ्या ,अर्धा कप पार्सले बारीक कापून, पाव कप कोथंबीर,१ चमचा जिरे, काळीमिरी पावडर चवीपुरती ,२ चमचे गव्हाचे पीठ ,तळण्यासाठी तेल, १ चमचा तीळ ,मीठ चवीनुसार
टीप - पार्सले नसतील तर कोथंबीर जास्त घ्या
बनवायची पद्धत -- सर्व जिन्नस एकत्र करून फूड प्रोसेसर मध्ये सरबरीत वाटून घ्या.एक महत्त्वाची गोष्ट यात पाणी घालायचे नाही. हे मिश्रण बनवून फ्रीज मध्ये ठेवू शकता.वरून तीळ घालून हाताने छोटे छोटे गोळे बनवून गरम तेलात तळून घ्या.झाले तयार फलाफील.
गरमागरम फलाफील ताहिना पेस्ट सोबत खा.हि ताहिना पेस्ट पुढच्या पत्रात लिहीन .
तूर्तास विराम
तुझीच मनिषा
 —
दुबईच्या मनीषा बेळगे दर रविवारी एक अनोखा अनुभव आणि एक अनोखी डिश ह्यांचे मनभावन मिश्रण सादर करतात. असे म्हणतात ....छान गप्पांबरोबर जेवले तर अन्न अंगी लागते....तुम्ही हा अनुभव आणि डिश...दोन्ही एन्जोय करा....

प्रिय आई, 
साष्टांग नमस्कार, पत्र मिळाल्याचा तुझा निरोप मिळाला. कालच सुनीताशी (माझी कॉलेजची मैत्रीण ) फोनवर बोलताना समजले कि आमच्या होमसायन्स विभागाच्या हेड सावंत मेडम तिला भेटल्या होत्या. त्या माझ्या आवडत्या मेडम असल्यामुळे मला त्याच्या सोबत घालवलेली ३ वर्षे डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखी तरळून गेली. सावंत मेडम आठवल्या कि N.S.S कॅम्प आठवलाच म्हणून समज. म्हणून मी यावेळी पत्रात तुला आमच्या कॅम्प् विषयीच्या आठवणींची पुन्हा आठवण करून देणार आहे. कॅम्प मध्ये खाल्लेल्या सुग्रास भोजनाची आज पुन्हा आठवण काढणार आहे.

तुला आठवत असेल तुझी इच्छा नसतानाही मी N.S.Sकॅम्प ला गेले होते. तू नकार एवढ्यासाठीच दिला होता कि माझ्या खाण्यापिण्याच्या सवयी तुला ठाऊक होत्या. आजी नेहमी म्हण्याची हिचं कसं होणार माहित नाही तू लाडावून ठेवलं आहेस. "खाईन तर तुपाशी नाहीतर लगेच उपाशी" तर आजीला सांग मी आजही बदलले नाही. "थोडे खाते पण चविष्ट खाते " आजही तशीच आहे म्हणून.

असो तर मी N.S.S कॅम्प् विषयी बोलत होते. सगळ्यात अविस्मर्णीय कालावधी म्हणजे आमचा N.S .S कॅम्पचे कसाबखेडा या गावी घालवलेले १० दिवस.त्यावेळी सावंत मेडम आमच्यासोबत होत्या. त्या कमालीच्या काळजीवाहू ,तेवढ्याच शिस्तप्रिय होत्या. आमचा हा कॅम्प औरंगाबाद येथील महिला महाविद्यालयात तर्फे गेला होता. जवळपास ५० विध्यार्थीनी आणि २ प्राध्यापिका ,२ प्यून आणि विशेष म्हणजे आमच्या भोजनाची व्यवस्था पाहणारे स्पेशल आचारी आणि त्याची मदतनीस मंडळी असा लवाजामा कसाबखेडा (वेरूळ पासून ४ कि ,मी अंतर ) या गावी गेलो होतो.

कसाबखेडा येथे एक धर्मशाळेत आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ती धर्मशाळा कुण्या मारवाड्याने बांधली होती.असे ऐकण्यात आले. प्रवेश केल्यावर एक मोठा हॉल त्याच्या बाजूला जेवणासाठी हॉल,वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी व्यवस्था होती. पाठीमागे मोठा आवार त्यात मोठे स्वयंपाकघर तशी धर्मशाळा अगदीच प्रशस्त होती. धर्मशाळा आणि लॉज यातील फरक मला तेंव्हा कळला होता. धर्मशाळा म्हणजे माझी एक वेगळीच संकल्पना होती. नंतर कधीतरी सांगेन. तिथे एक अगदीच विशेष गोष्ट म्हणजे " सामुहिक स्नानगृह ". काही मुली तर नाहीच म्हणत होत्या मग मेडम नि त्यानुसार आमचे गट बनवले. आम्हा सर्व मुलींची एकमेकीना लाजून आणि हसून पुरेवाट झाली होती, काय करणार नाईलाज होता. स्वच्छता गृहे मात्र वेगवेगळीच होती,ते बघून जीव भांड्यात पडला होता.

आणखी एक न विसरता येणारा असा विलक्षण अनुभव, म्हणजे आम्ही ५० मुलीनी मिळून त्या गावातील मध्वर्ती भागात मोठे मोठे खड्डे असलेला रस्ता माती आणि मुरूमचा भराव टाकून चांगला बनवला होता. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आजही मी विसरू शकत नाही. त्या रस्त्यावरील खड्यांमुळे तो रस्ता रह्दारीकारिता बंद करण्यात आला होता. गावातील एका व्यक्तीने त्यांच्या ट्रकटरने गावाबाहेरून खूप सारा मुरूम आणि माती आणून दिली होती. अगदी सकाळपासून, संध्याकाळपर्यंत आम्ही रस्ता तयार केला होता. १० दिवस भरगच्च प्रोग्रामस केले होते.everything was planned by sawant madam.

त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, हेल्थ शिबीर, रक्तदान शिबीर, पथनाट्य, गावाची साफ सफाई, गावकऱ्यानं सोबत गप्पा, संध्याकाळी साक्षरतेचे वर्ग हि घेतले. १० दिवसात खूप काही केले. एकंदरीत गावातील व्यक्तींकडून "अडी अडचणीवर मात करून जीवन कसे जगावे "हेच जास्त शिकायला मिळाले. प्रचंड गैरसोयीमध्ये हि गावकरी सुखीच होते. विशेष म्हणजे आमच्याबरोबर आलेला आचारी एवढे स्वादिष्ट भोजन बनवायचा कि तुझ्या हातच्या जेवणाची पण आठवण नाही आली. रागवू नकोस तुला माहिती आहे. तूच म्हणतेस ना कशाचे कौतुक करताना कंजुषी करू नये.

आम्ही पहाटे पाच वाजता उठत असू,सकाळचा चहा घेऊन गावातून एक प्रभात फेरी मारून साधारण तासाभराने परत धर्मशाळेत परत येत असू. मग फ्रेश होऊन नाश्ता करण्यास जेवणाच्या हॉल मध्ये जमत असू, नाश्त्यासाठी पोहे, उपमा ,वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी मिळत होत्या. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाचीही चांगलीच चंगळ होती. रोज वेगळा मेनू असायचा.म्हणतात आपण कुठेही एखाद वेळी सुग्रास जेवण जेवलो तर त्याची चव तुमच्या जिभेवर रेंगाळत असते.हे अगदी खरे आहे. आई !!!!

एकदिवस तर वनभोजनास गेलो होतोत, तेही बैलगाडीतून,आम्ही सर्वांनी आळीपाळीने बसून बैलगाडीच्या प्रवासाचा आनंद लुटला होता. बैलगाडीचा बंदोबस्त गावातील एका प्रतिष्ठीत व्यक्तीने केला होता. त्यांच्याच शेतात आम्ही वनभोजनासाठी गेलो होतो. मनोसोक्त बोरे,चिंचा खाल्या. सावंत मेडम मध्ये मध्ये दरडावायच्या कमी खा,आजारी पडाल. सुदैवाने कुणी आजारी पडले नाही. नेमकी दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री होती. त्यादिवशी घृष्णेश्वरचे दर्शन घेतले होते. सोबत सगळा उपवासाचा फराळ होता. साबुदाणा वडा,साबुदाण्याची उसळ, शेंगदाण्याची आमटी, बटाटा भाजी, ताक वगैरे एकूण खाऊन पिवून उपवास केला. एक दिवस तर ,सावंत मेडम म्हणाल्या रात्रीचे जेवण एकदम गावाच्या स्टाईल बनवा. झुणका भाकरी टाईपचे, मग त्यादिवशी बाजरीच्या पिठाच्या भाकरी आणि पिठले (झुणका) मसाले भात, हिरव्या मिरच्याची झणझणीत चटणी (ठेचा ,खर्डा अशी वेगवेगळ्या भागातील नावे) आम्ही सर्वांनी मस्त ताव मारला, बाजरीच्या भाकरी सर्वांना आवडतात असे नाही तरीही मुलीनी न आगे देखा न पिछे सिधा भाकरीवर तुटून पडलो, तरी सावंत मेडम म्हणत होत्याच मुलीनो जपून नाहीतर रात्री पोट दुखेल.बऱ्याच जणींनी घाबरून ठेच्याकडे खाणे दूर तिकडे बघितले पण नाही. या सगळ्यात मला खास लक्षात राहिली ती एक भाजी त्यादिवशी पहिल्यांदा खाल्ली हि भाजी कोणती असावी आम्ही आपपसात बोलत होतो, शेपू ची भाजी असा निष्कर्ष निघाला पण ती थोडीशी आंबट पण लागत होती.मग थेट आचाऱ्यालाच विचारले शेपू आणि आंबट चुका.

मला आठवले आई तू बऱ्याचदा बनवायचीस पण मला आवडणार नाही म्हणून नेहमी वेगळी भाजी करायचीस. त्यामुळे या भाजीचा स्वाद मी कधी घेतला नव्हता. मी मात्र त्याकडून रेसिपी लिहूनच घेतली. तू कशी बनवतेस माहित आहे पण साहजिकच त्याची रेसिपी वेगळी होती.

मी इथे Dubai मध्ये आणखी थोडा बदल करून करत असते मुलांना हि आवडायला लागलीय, Dubai मध्ये "Baqer Mohebi Supermarket" आहे फक्त तिथेच आंबट चुक्याची भाजी मिळते मात्र मेथी पालक,शेपू सगळीकडे उपलब्ध असतात.माझ्याकडे आठवड्यातून एकदा बनतेच. मी मूळ रेसीपी मध्ये बदल करून करत असते. मी तुला रेसिपी देते तू नक्की करून बघ मिक्स भाजी साहित्यः साधारण ४ व्यक्तींना पुरेन एवढी अर्धी जुडी शेपू , अर्धी जुडी पालक, हिरवा वाटाणा अर्धी वाटी, आंबट चुका अर्धी जुडी घ्यावा, १ चमचा लसून मिरची पेस्ट 2 चमचे दाण्याचे कूट 2 चमचे बेसन, चवीप्रमाणे मीठ, २ चमचे तेल, चिमुटभर हळद व हिंग, १ चमचा लसून आणि कांदा बारीक कापून (जिवंत फोडणी करिता ) जिरं,मोहरी फोडणीसाठी

कृतीः सर्व भाज्या निवडून स्वच्छ धुवून घ्याव्यात, त्यातील फक्त शेपू आणि पालक या भाज्या बारीक कापून घ्यावयात.पालक ,शेपू आणि वाटाणा प्रथम शिजण्यास टाकावा नंतर आंबट चुका टाकावा कारण चुका लगेच शिजतो. त्यात थोडे पाणी घालून भाज्या मऊ शिजवून घ्याव्यात.पालेभाज्या जास्त शिजवू नये त्यातील जीवनसत्वे नष्ट होतात ,आणि प्रेशर कुकर मध्ये जर शिज्वल्या तर अधिक जीवनसत्वे वाचतात. हे तुला माहितच आहे . असो नंतर भाजी मोठ्या चमच्याने एकजीव करून घ्यावी. त्यात डाळीचे पीठ ,लसून मिरची पेस्ट ,चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकजीव करून घ्यावे. कढईत जिरं ,मोहरी हिंग ,हळद फोडणी करून त्यात तयार मिश्रण घालून स्लो फ्लेम वर गॅसवर शिजत ठेवावी. गरजेपुरते पाणी घालून शिजू द्यावे नंतर त्यात दाण्याचे कूट घालावे. आणि जेवणास घेण्या अगोदर जिवंत फोडणी साठी तेल गरम करून त्यात लसून आणि कांद्याचे पातळ उभे काप घालावे लालसर कुरकुरीत झाल्यावर पळीने वरून भाजीत घालावे. खूपच टेस्टी लागते. सर्व एकत्रित करून चपाती सोबत खायला देणे अथवा बाजरीची, ज्वारीची, तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी (हि सगळी पीठे दुबईमध्ये उपलब्ध आहेत).

कॅम्प च्या शेवटच्या दिवशी अंतकरण भरून येत होते ,आमच्यातील काही भगिनींनी गळ्यात पडून भावनांना वाट मोकळी करून दिली होती. माझे हि डोळे पाणावले होते. न जाणो भविष्यात या सगळ्या मैत्रिणी आणि मेडम पुन्हा असे एकत्र राहण्याचा योग येईलच असे नाही.त्यांनतर खरच तसा योग आलाच नाही. आम्हला निरोप देण्यासाठी अख्खा गाव आला होता बालगोपाळांसह बाया बापड्या, वडीलधारी मंडळीनी पुन्हा येण्याचा आग्रह करत होती. ते अगदी मंतरलेले दिवस होते विसरणे कदापि शक्य नाही.
तूर्तास थांबते पुन्हा लिहीनच.
तुझीच मनिषा
मनीषा बेळगे "खाईन तुपाशी" मध्ये एक वेगळीच रेसिपी घेऊन आल्या आहेत....

प्रिय आई साष्टांग प्रणाम,

आज च्या पत्रात मी थोडे अवांतर लिहितेय. नेहमीच्या पाककृती ऐवजी आज नात्याची रेसिपी लिहिलीय. तुला आवडेलच अशी माफक अपेक्षा. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ "नात्यातले ओयासिस " (ओयासिस = वाळवंटातील नैसर्गिक पाणवठा )
तशी नाती खूप असतात,पण काही नुसतीच माती असतात. रक्ताची नाती, कृत्रिम नाती, मानलेली नाती, जबरदस्तीने लादलेली नाती या नात्याच्या वाळवंटात एखादे " नात्यातले ओयासिस " असावे. अखंड ओलावा असणारे, गोड आणि माधुर्य असणारे, कधीही न आटणारे ओयासिस असावे.

गरजेतून एखादे नवे नाते जन्मास येते. कधी तात्पुरते,कधी एकटेपणामुळे मुळात स्वार्थातून अस्तित्वात येते. नंतर अशा नात्याचा सहवास हवासा वाटतो, नात्यातला हळुवार पण जपावा वाटतो तेच नाते आपले " नात्यातले ओयासिस" होऊन जाते. तशी नात्याची कमी नसतेच, अगदीच कमी असतात ती "जवळची नाती " आता काही जवळची नाती फार जपून ठेवलेली अत्तराची कुपीप्रमाणे असतात, त्यातले अत्तर संपले तरी ती का जपतो हे मात्र मोठे कोडे आहे, कधीही न सोडवता यावे इतके अटळ…

"आपण ज्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागतो, ती नाती जवळची कि, जी नाती आपल्या मनाप्रमाणे वागतात ती जवळची ? हा उहापोह इथेच संपत नाही. एकमेकांच्या मनाप्रमाणे वागणे परिस्थितीनुसार बदलत जाते आणि मुखवट्यांच्या आत लपलेले चेहरे आपल्या समोर येतात, कधी उगाच भूतकाळ स्मरून ते नाते जपले जाते. मुळात अशा नात्यांपासून आपण दूर पळण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो इतकचं…

काही नाती हेतुपुरस्सर असतात, काही समाज व्यवस्थेने लादलेली असतात. त्या त्या नात्याची मुळे इतकी रुजलेली असतात कि ती नकळत गृहीत धरली जातात.

बहुतेक वेळा हा द्वेष एकतर्फी असतो …. दुसऱ्या बाजूला पळवाट शोधण्याची गरजही पडत नाही. एक दुरावला कि दुसरा आपोआप दुरावतो, त्यावेळी मन आणि बुद्धीत द्वंद्वयुद्ध जडते. मनाला जे हवे असते,ते बुद्धीला पटत नाही. आणि बुद्धीला योग्य वाटते ते मन मानत नाही. तरी चंचल मन पुन्हा पंख फैलावून उड्डाण करते नवीन ओयासिस दिशेने …

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~ आई जे सुचले ते कागदावर मांडले यातले किती चांगले आणि किती वाईट हे निवडायचे काम तुझे … तांदळातले खडे निवडते न अगदी तसे काम आहे.
*तूर्तास थांबते * पुन्हा लिहीनच

तुझी लाडकी लेक

मनिषा
तर रविवारच्या मेजवानीत मनीषा बेळगे ह्यांचे "खाईन तुपाशी"......हिंदी मध्ये एक गाणे होते आठवते का किशोर कुमारचे "जाते थे जापान...पहुच गये चीन"
हा हा हा...

पत्र लिहिण्याआधी थोडेसे – 

"न लिहिलेले पत्र " या पेजची यशस्वी घोडदौड सुरु आहे. त्यासाठी संचालक ,सहसंचालक आणि समस्त पत्र लेखक वृंद आणि मायबाप वाचक यांचे अभिनंदन …।

रविवारच्या मेजवानी मध्ये सदर लिहिशील का ? असे जेंव्हा व्ही.बी सर यांनी विचारले असता, तसे जोखमीचे काम असूनही मी तत्काळ होकार दिला. "नेकी और पुछ पुछ" पण प्रश्न होता कुठल्या विषयावर लिहावे. तसे मला राजकारणात जास्त रस आहे. पण तरीही वेगळे लिहिण्याचा मानस होता. मग मी पत्रातून रेसिपी लिहिण्याचा विचार बोलून दाखवला. व्ही.बी सरांनी खूप प्रोत्साहित केले. त्यांनी विचारले पत्र कोणाला लिहिणार, मी म्हंटले अर्थात आईला, आई इतकि जवळची मैत्रीण कोणी नाही. सरांनी लगेच समंती दिली. आम्ही काही शीर्षकांवर चर्चा केली शेवटी "खाईन तुपाशी" हे शीर्षक ठरवले आणि पत्र लिखाण सुरु झाले. किती दिवस चालेल, हे आताच सांगता नाही येणार. पण प्रत्येकवेळी पत्र पोस्ट झाल्यानंतर जे समाधान मिळते ते मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. लाखो धन्यवाद व्ही.बी. सर........

प्रिय आईस,

तुझ्यातल्या संवेदनशीलतेला कोटी कोटी प्रणाम, नेहमीप्रमाणे या हि वर्षी तू सुलोचनाला कामावर ठेवले असशील. दिवाळी आली कि हि येते, बाकीचे दिवस कुठे असते कोण जाणे.कितीतरी वेळा तिला तू चोरी करताना रंगेहात पकडलेय. तरीही तू सर्व विसरून पुन्हा कामाला ठेवतेस. चोरी करणाऱ्याला कोणी चांगले बनण्याची संधी देतं का ? तू मात्र अजब आहेस तू पुन्हा पुन्हा तिला सुधरण्याची नाही तर चोरी करण्याची संधी देतेस. तुझा आपला ठाम विश्वास, ३ मुलींची आई आहे, मुलगा होत नाही म्हणून नवऱ्याने टाकलीय, आईवडील वारलेले , जवळचे असे तिला कोणी नाही,मग आपण थोडा आधार दिला तर कुठे बिघडले. आज तिच्यावर वेळ आलीय, म्हणून ती तशी वागतेय.एक दिवस नक्की सुधारेल.……. मान्य आहे पण पूर्वी ती आपल्याकडे राह्यची, मळ्यात तिला एक खोली पण दिली होती. मुलीही शाळेत जात होत्या. अचानक तिला काय दुर्बुद्धी सुचली. छोट्या मोठ्या चोऱ्या करायला सुरवात केली.एक दिवस तिने तुझ्या नवीन साड्या पळवल्या. आणि त्यांनतर ती मुलीन् सहित अचानक गायब झाली. तू माहिती काढली तर कळले कि तिला एक दूरचा मामा होता. तिकडे गेलीय. आतापर्यंत हा मामा कुठे होता ? त्यांनतर ती बरोबर ६ महिन्यांनी परत आली. माफीचा एकही शब्द तिने उच्चारला नाही . आणि तू तिला पुन्हा कामावर ठेवलीस.….

असो आता तू म्हणशील, तुला तिने बनवलेला स्वयंपाक आवडतो ना . "हो ग आई तिच्या हाताला खूप छान चव आहे". एवढ्या एका गोष्टीसाठी माझा तिच्या विषयीचा विरोध संपून जातो. तिने बनवलेल्या पदार्थाचे नाव काढशील तर, माझे असले नसलेले अवसान गळून पडते. उन्हाळ्यात वाळवण बनवताना तिची तुला फार मदत व्हायची कोहळ्याच्या वड्या , कुरड्या ,पापड , साबुदाण्याचे पापड, ज्वारी बाजरीच्या पापड्या याशिवाय मसाले सुद्धा उत्तम बनवायची अर्थात तूच शिकवले होते. सुलोचनाच्या हातचा माझा आवडता पदार्थ म्हणजे शेंगदाण्याचे लाडू मला आठवते मी सुट्ट्यात गावी येणार म्हंटले कि,मला आवडतात म्हणून, ती हमखास तिळाचे, शेंगदाण्याचे लाडू कुटून बनवायची. दुबईत आल्यावर मी बऱ्याचदा बनवते, पण सुलोचना सारखे नाहीत होत.

अरे हो खाण्यावरून वरून आठवले. तुला मी आज मी एक गंमतीशीर रेसिपी सांगणार आहे. हि रेसिपी माझ्याकडून अपघातानेच घडली. म्हणतात न "करायला गेले गणपती आणि झाला मारुती" तसा काहीसा प्रकार झाला खरा, पण सगळ्यांना आवडून गेली. मग मी माझे गुपित कोणाला सांगितले नाही. फक्त तुला सांगते. हे वाचून आता हसू नकोस गालातल्या गालात.

तर आपण कुठे होतो …. अरे हो रेसिपी ,त्याचे काय झाले तुझ्या नातवाला पार्ले जी आणि गुड डे बिस्कीट आवडतात. बऱ्याचदा बिस्कीट पुडा खोलताना कधी बिस्कीटचे तुकडे होतात. तो तुकडे खात नाही. एकदा असेच डबा भरून तुकडे जमा झाले होते. धड फेकुनही देत येत नव्हते. कोणाला द्यावे तर इथे भिकाऱ्यांचा दुष्काळ, काय करावे सुचत नव्हते, मला आठवले एकदा मी मारी बिस्किटचा केक बनवला होता. तसाच बनवता येईल का म्हणून मी प्रयत्न करत होते. मग काय सर्व बिस्किटांचा व्यवस्थित चुरा करून घेतला. एकदा मिक्सरला लावले. मस्त पावडर तयार झाली. केक मध्ये बिस्किटाची टेस्ट समजायला नको म्हणून तो चुरा साजूक तुपात खरपूस भाजून घेतला. केकसाठी लागणारे साहित्य घेतले. आता या भाजलेल्या चुऱ्या मध्ये लोणी ,आणि क्रीम मिसळण्या आधी, मी बाजूला थोडे मिश्रण करून बघितले नुसताच चिकट लगदा तयार झाला. आता या चिकट लगद्याचा केक बनणे शक्य नव्हते. आता चांगल्या १ किलो चुऱ्याचे काय करावे सुचत नव्हते. मग मनाला म्हंटले लढ मना लढ. बर्फी , पनकेक, पराठे, करंजी झाली तेवढी मेहनत खूप झाली होती त्यामुळे अजून करंजी किवा बर्फी बनवण्या इतका वेळ वाया घालवू नये असे वाटत असताना एकदाचे सुचले सुचलेच बघ " लाडू "!

मग थोडे डेसिकेटेड कोकोनट , काजू ,बदाम ,पिस्ते यांचे तुकडे करून घेतले. थोडी पिठी साखर घेतली. चुऱ्या मध्ये सर्व मिसळले. अजून थोडे तूप टाकले. लाडू वळवायला घेतले. लाडू काही वळत नव्हते. आता पुन्हा डोके दुखी आता तर ड्रायफ्रुट्स टाकल्यामुळे फेकण्याची अजिबात हिम्मत होत नव्हती. मग दुध गरम केले, मिश्रणात गरम दुधाचा हलकासा शिडकावा मारलाऽनि आईईईई मी जिंकले होते. लाडू वळून तयार. केवढा आनंद झाला म्हणून सांगू.

पण अजून एक पायरी बाकी होती. चव कशी झाली असेल? अत्यंत महत्त्वाची परीक्षा अजून बाकी होती. मुले अजून शाळेतून आली नव्हती. कोणाला टेस्ट करायला सांगावे याच विचारात असताना, दारावर बेल वाजली. एक मैत्रीण आली होती. मी तिला काही कळू देत लाडू खाण्यास दिला. तिने आणखी एक मागवून घेतला. तिला आवडला. कशाचे लाडू म्हणून ती विचारून थकली,तरी मी काही सांगितले नाही. तिच्या मुलाकरता डब्यात काही लाडू दिले. एकंदर चव छान झाली होती याचे समाधान मिळाले. आमच्याकडे बिनबोभाट लाडू फस्त झाले. कोणाला सुगावा लागला नाही. संध्याकाळी त्याच मैत्रिणीचा फोन आला, अग कशाचे लाडू बनवलेस सांग तरी नाहीतर मला बनवून दे आमच्या घरी सर्वाना आवडलेत. तेवढ्यात तिच्या मुलाने फोन घेतला म्हंटला काकू गुड डे लाडू छान झालेत. तिच्या मुलाने गुडडे बिस्कीट ची चव ओळखली असावी. माझ्या या करामतीला नाव हि मिळाले "गुड डे लाडू" …

आता म्हंटले चला हि रेसिपी आपल्या नावावर जमा झालीय. कोण आनंद झाला म्हणून सांगू आत्ता तू हि ट्राय कर. नाहीतर मी तिकडे आली कि बनविण.
तूर्तास थांबते
तुझी लाडकी लेक मनिषा


मनीषा बेळगे आज एक मस्त डिश घेऊन आल्या आहेत "खाईन तुपाशी" मध्ये...त्यांचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे...त्या फक्त रेसिपी देत नाहीत...एका संस्कृतीशी ओळख करून देतात....एका जगाशी ओळख करून देतात...तुम्हाला पटते ना माझे म्हणणे ?....

प्रिय आई,

मी साष्टांगभावे पुढचे मनोगत लिहित आहे, वाचून घ्यावे.
मला नेहमी वाटते भारतीय संस्कृती हि खादाड संस्कृती म्हणून गणली जात असावी. आपल्या देशात जेवढे खाल्ले जाते आणि जेवढे खाऊ घातले जाते, जगाच्या पाठीवर कुठेच नसेल. (उपाशी पोटी तितकेच लोक असतात तो भाग वेगळा )

पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने करून बघण्याची हौस सर्वात आधी कोणत्या आदिमानवाला झाली असावी?तसा संशोधनाचा विषय आहे.प्रत्येक पदार्थ अपघाताने तयार झाला असावा कि मुद्दाम बनवला असावा.
असो मी फार खोलात जात नाही.कारण तसे धागेदोरे मिळण्याची सुतराम शक्यता वाटत नाही.

" खाण्यासाठी जन्म आपुला " काही लोक तर या म्हणी मध्ये अगदी फीट बसतात. अशीच माझी एक मैत्रीण आहे भयंकर खादाड मांसाहारी पदार्थांची शौकीन,एकदा एका चीनी हॉटेल मध्ये स्पेशल साप मिळतो, अशी माहिती मिळाल्यावर बयेने लगेच भेट दिली. मला वर्णन करून सांगू लागली. तिला म्हंटले तू आधी वर्णन बंद कर,नाहीतर मला २ दिवस जेवण जाणार नाही. असे वर्णन कि जशी आफ्रिकेतील जंगलातून तिला मेजवानी आलीय.तिला म्हंटले किती खाशील,तुझ्या खाण्याला काही मर्यादा, खाऊन खाऊन मरशील. यावर बयेचे उत्तर " अगं न खाता मरण्यापेक्षा, भरपेट मनोसोक्त खाऊन मेलेले बरे.असो ,खाऊ दे. मला काय त्याचे तसेही तू म्हणतेस न "अन्न हे पूर्ण ब्रम्ह" असते कोणाच्या खवय्येगिरीला आणि खाद्य् पदार्थांना नावे ठेवू नये. म्हणजे खेकडा, साप,मुंग्या,बेडूक,पालं, घोरपड यांच्या पदार्थांना हि अन्न हे पूर्ण ब्रम्ह म्हणावे कि काय? सध्या या घोर विवंचनेत आहे. असो

तसेही जगात सर्वच प्राणी मांसाहारी नसतात. काही अजूनही शाकाहारी आहेत. एका सर्वेक्षणाच्या आधारे,पाश्चात्य देशात शाकाहारी जेवणाचे महत्व पटू लागलेय. अनेक लोकांनी मांसाहार सोडून शाकाहार अंगिकारला आहे.

तसेही जगात प्रत्येक देशाच्या अन्न रांधण्यापासून खाण्याच्या पद्धती देखील वेगवेगळ्या आहेत. आपल्या कडे हाताने खातात, पाश्चात्य देशात सुरी, काटे, चमचे आणि चीन, जपान मध्ये चॉप स्टिक( म्हणजे २ काड्या )ने खातात. प्रत्येक ठिकाणचे आपले स्वतःचे असे वैशिष्ठ्य पूर्ण खाद्य आहे.जगात प्रथम पसंतीचे भोजन सर्वेक्षणानुसार प्रथम १० देशात भारताचा समावेश आहे. ग्रेट न. भारतीय जेवण तिखट आणि तेलकट असते. असा बऱ्याच लोकांचा गैरसमज होतो.

सध्या दुबई मध्ये मी ज्या भागात राहते, त्याला अल करामा म्हणतात याला आणखी एक टोपण नाव आहे ते म्हणजे "मिनी इंडिया" ...अगदी या नावाला साजेशा भाग आहे.जास्तीत जास्त भारतीय हॉटेल्स आहेत.अरेबिक भाषेतील दुकानच्या पाट्या आणि दर अर्ध्या तासाने गस्त घालणारी पोलीसची गाडी सोडली तर सगळे भारतीय वातावरण आहे.त्यामुळे आपण भारतातच आहोत असेच वाटते.

आज मी तुला अरेबिक डिश हमुस बद्दल सांगणार आहे.हमुस शिवाय आखाती देशातील जेवणाला पूर्णत्व येत नाही.हि रेसिपी अत्यंत सोपी आहे.आणि चविष्ट देखील

हमुस

साहित्य -१ वाटी काबुली चणे (रात्रभर भिजवलेले ),५ लसून पाकळ्या,२ चमचे लिंबाचा रस, ४ चमचे ओलिव्ह ओईल,१ चमचा तहीना पेस्ट किंवा १ चमचा भाजलेले तीळ, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मीठ,१ कप पाणी
कृती - सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी.त्यात वरून ओलिव्ह ओईल घालावे तयार झाले हमुस, कुठल्याही टोस्ट केलेल्या ब्रेड सोबत छान लागते. वरती चिमुटभर लाल मिरची पावडर आणि पार्स्ले ने सजावट करावी. पार्स्ले नसेल तर कोथंबीर हि चालेल.

हा पदार्थ वांग्याचे तळलेले काप,भजी काकडी, गाजर यांचे काप यासोबत देखील खालला जातो.

अगदी सोपा आहे. हा पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून २ दिवस टिकतो.
नक्की बनवशील. तुला आवडला कि नाही कळव.

तूर्तास थांबते
तुझी लाडकी लेक
मनिषा
मनीषा बेळगे ह्या दुबईत बसून...आपल्या पोटाची आणि जिभेची काळजी घेत असतात...आज त्यांनी आपल्या राशींची सुद्धा काळजी घेतली आहे...क्या बात है...हे पत्र...धुमाकूळ घालणार असे माझे भविष्य आहे....करा..शेयर...हवे तेवढे....

प्रिय आई, 

"माँ की चरणों में साष्टांग प्रणाम " 

आई माझी एक मैत्रीण आहे "नितू". तिला खाण्याचा आणि खाऊ घालण्याचा खूप शौक आहे.तिचा एक नित्यनेम आहे रोज संध्याकाळी वाटीभर दुध आणि ब्रेडचे तुकडे बिल्डींगच्या मागे फिरणाऱ्या मांजरीसाठी देणार. दुबईमध्ये बेवारस मांजर खूप आहेत पण मोकाट फिरणारे कुत्रे नाहीत, पाळीव कुत्रे आहेत, पण त्यांचा पासपोर्ट असतो.असो ...


सांगायचा मुद्दा असा कि, तिला ज्योतिष शास्रावर भलताच विश्वास, कोणी तिला सांगितले मांजरीला दुध देत जा. तुझे हेल्थ प्रोब्लेम दूर होतील.हेल्थ प्रोब्लेम म्हणजे बाईसाहेब कोणत्या वेळेला काही खाणार,प्रॉब्लेम तर होणारच. नशीब मांजरीला दुध पाजण्यास सांगितले, कुत्रा म्हंटला असते तर हिने कुत्रा सुद्धा विकत घेतला असता. तिला सांगितलेले भविष्य खरे ठरते कि नाही माहित नाही, पण नितुचा प्रचंड विश्वास आहे. प्रत्येक ज्योतिषाने सांगितलेले तिला खरेच वाटते. एकदा तिने राशीवरून लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बद्दल माहिती मिळवली. तिने माझ्या सोबत शेअर केली, मी तुझ्यासोबत शेअर करतेय कारण त्यात माझ्या राशीची माहिती मला खरी वाटते, आता तू बघ तुला हि माहिती कशी वाटतेय.

नीतू म्हणते कोणी तिला सांगितलेय कि, लोकांच्या राशीवरून त्यांच्या खाण्या पिण्याच्या सवयी माहित करता येतात. मनात म्हंटले अरे वा,म्हणजे अमुक तमुक व्यक्ती घरी येणार असेल तर त्याचे आवडीचे पदार्थ आपण बनवून सदरील व्यक्तीस अचंबित करू शकतो. तिला म्हंटले "nitu… not a bad idea, tell me" तिने तिच्या शब्दात सांगितले ते असे, क्रमाने सांगते.

मेष राशीचे लोक उतावळे असतात चहा ,कॉफी जास्त पितात. यांना गोड आणि मसालेदार जेवण आवडते.

वृषभ राशीची व्यक्ती नेहमी हेल्दी जेवण करणे पसंद करते.या लोकांना घरगुती जेवण जास्त आवडते.

मिथुन राशीची व्यक्ती सतत काही ना काही खात असते.पकोडे ,समोसा असे नाश्ता टाईप पदार्थ यांना आवडतात. हि व्यक्ती खाताना बरीच कामही करत असते उदा. टी व्ही बघणे, फोनवर बोलणे,लिहिणे वाचणे.

कर्क राशीच्या व्यक्ती बऱ्याच गोष्टींचा परहेज करतात कारण यांची पाचन क्रिया कमजोर असते. यांना गोड पदार्थ आवडतात.

सिंह राशीच्या व्यक्ती खाण्याच्या बाबतीत खूप रेग्युलर असतात. गरम गरम जेवण आवडते ,सूप आणि तत्सम गरम पदार्थ यांचा विक पोइंत आहे.

कन्या राशीचे लोक हेल्थ कॉन्शस असतात. तरीही यांचे वजन वाढतच असते. त्यामुळे या लोकांनी ओवरडायटिंग ला आवर घातला पाहिजे.

तूळ राशीची व्यक्ती वजनाच्या बाबतीत फार खबरदारी घेते. पण गोड पदार्थ यांची कमजोरी असतात. हि लोकं खाण्याची सजावट आणि खाण्याच्या खुशबू ची दिवाणी असतात.

वृश्चिक राशीच्या व्यक्तीं टेन्शन मध्ये जास्त जेवण जेवतात. एकसाथ खूप सारे जेवण्याची सवय असते.

धनु राशी च्या व्यक्ती नेहमी घाईत असतात ,घाईघाईने जेवण उरकल्याने न जेवणाची चव लागते, न सेहत बनते. जास्तीची चरबी मात्र वाढते.

मकर राशीच्या व्यक्ती खाण्याच्या बाबतीत फार काळजीपूर्वक सवयी पाळतात, जेवताना त्या इतर कामे करत नाहीत. जेवण अतिशय साधे आवडते.

कुंभ राशीच्या व्यक्तींना हलकेफुलके जेवण आवडते. नाश्त्याचे पदार्थ जास्त आवडतात. चहा कॉफी जास्त पितात .
मीन राशीच्या व्यक्तींच्या खाण्याच्या सवयी वातावरण बघून बदलतात, जेवणात खूप सारे पदार्थ यांना पसंत असतात.

तर हे आहे खाणाऱ्यांचे राशिभविष्य एकूण अशा भविष्यावर विश्वास ठेवला तर असे दिसते कि आपल्या खाण्याच्या सवयी या आपल्या जन्मतः आपल्या सोबत आलेल्या असतात .हे बाकी गमतीशीर आहे. म्हणजे कुणी आई तक्रार करत असेल कि तिची मुले जेवत नाहीत ,तिने जरूर त्यांचे राशिभविष्य इथे ताडून पाहावे.

भविष्याच्या नादामध्ये विसरलेच,तुला आज मी खरवसाचे पुडिंगची रेसिपी सांगणार आहे. आई तू म्हणशील खरवस मला येतो ,मग मी कुठे नाही म्हणतेय, पण तुला खरवस बनवायला कोवळे दुध(colostrum milk) उपलब्ध असते. आणि मी इथे कुठे कोवळे दुध शोधत बसू ,मी जी रेसिपी सांगणार आहे तिला कोवळ्या दुधाची आवश्यकता नाही. थेट खरवसाची चव देते. कदाचित बऱ्याच लोकांना हि रेसिपी माहित असावी पण तुला नक्कीच माहित नाही. मग मी कशाला आहे? मी सांगते ना,

साहित्य - १ कप दुध,१कप दही,१कप कंडेन्स्ड मिल्क, १ कप दुधपावडर सजावटीसाठी बदाम, पिस्त्याचे काप कृती -सर्व साहित्य एकत्र करून एकाच दिशेने फेटून घ्या अथवा मिक्सर मध्ये एकजीव करून घ्या. एका अल्युमिनियमच्या भांड्याला तुप लावून ग्रीस करून घ्या त्यामध्ये वरील मिश्रण ओतून वरून बदाम पिस्त्याचे काप टाका वरून अल्युमिनियम फोइल लावून बंद करा. कुकरमध्ये थोडे पाणी घालून वरील भांडे त्यात ठेवा कुकुरची शिटी काढून ठेवा,मध्यम आंचेवर २० मिनिटे शिजवा थंड झाल्यावर ताटात उपडे करून,वड्या कापा,मऊ लुसलुशीत खरवसाच्या वड्या किंवा पुडिंग खाण्यासाठी तयार हि रेसिपी मला चीज केकवरून सुचली,चीजकेक खाऊन लट्ठ होण्यापेक्षा, माझ्या मते हे पुडिंग हेल्दी असावे.
तूर्तास थांबते पुन्हा लिहीनच

तुझी लाडकी लेक

मनिषा
तर आठवते का गाणे "पान खायो सैया हमार" ...अशा ह्या पानाची गोष्ट घेऊन आल्या आहेत मनीषा बेळगे .... "खाईन तुपाशी" मध्ये

प्रिय आई,

साष्टांग प्रणाम माझ्या घरी गणरायाचे आगमन झालेले आहे, त्यामुळे खूप व्यस्त आहे. गणपतीची आरास, आरती ,प्रसाद एवढ्या धांदलीत मी तुला पत्र लिहितेय. गणेश मूर्ती ची स्थापना करण्यासाठी खाण्याचे पान आणि सुपारीची आवश्यकता असते. तसे दुबई मध्ये हि गोष्ट अतिशय दुर्लभ आहे. कारण इथे कायद्याने गुटखा,पान,तंबाखू, खसखस यांना बंदी आहे. या गोष्टी आपणाकडे आढळून आल्यास चांगलाच दंड आहे, जेल हि होऊ शकते. तरीही काही बहादूर विक्रेते या गोष्टी लपून छपून विकतात. पानाची टपरी वगैरे तुला दिसणार नाही. सिगरेट मात्र राजरोसपणे विकली जाते कारण सिगरेट स्टेटसचा एक भाग आहे आणि पान खाणे म्हणजे निव्वळ देहातीपणा एकूण पान खाऊन मारलेल्या पिचकाऱ्याचे दर्शन इथे होत नाही.

तर हे खाऊचे पान पूजेसाठी मी मिळवलेच. या पानाविषयी माझी उत्सुकता फारच वाढली म्हणून थोडी फार माहिती मी मिळवली. संस्कृत मध्ये पानाला ताम्बूल आणि गुजराती मध्ये नागुरवेल म्हणतात,तर आपण याला विड्याची पाने म्हणतो. असे म्हणतात १०० पाने १ किलो तुपाच्या ताकदीची असतात, आता खरे खोटे देवाला माहित, कारण ती देवाला पूजेत लागतात.

भारतात सर्वच राज्यात पान आणि सुपाऱ्या देवकार्यासाठी जातात.सांगायचा मुद्दा असा कि आपल्याकडे या पानाशिवाय कुठलेही धार्मिक कार्य तसेच लग्न,मुंज वैगरे पार पडत नाही. तर ह्या पानाचा शोध प्रथम एका बेटावर लागला, पुढे मुगल सल्तनत मध्ये फार लोकप्रिय झाले.पानाचा महिमा सिनेमापासून तर मुजरा ऐकणाऱ्या पर्यंत सर्वांनाच माहित आहे. ह्या पान प्रेमातून कोणी सुटले नाही. पानाची काही प्रसिद्ध नावे, काही गाणी, मुजरे, एवढेच नाही तर ओव्या, अभंग तसेच श्लोक हि लिहिल्या गेलेत. मध्यंतरी गुटख्याचे आगमन झाल्यावर या पानाच्या विक्रीवर परिणाम झाला खरा, पण पानाचे स्थान अढळ राहिले.

मी तुला पानाचे गुण सांगतेय याचा अर्थ असा मुळीच नाही कि तू किंवा कोणी पान खाण्यास सुरुवात करावी. पान तसे वाईट नाही गुटखा, तंबाखू आणि सिगारेट पेक्षा ठीकच आहे. तसा पानाचा विडा मुखशुद्धी आहे खरा पण दाताच्या शुभ्रतेची पार वाट लागते.पानातील औषधी गुणधर्मामुळे सर्दी पडसे, डोकेदुखीलाही आराम मिळतो.

पान लावण्याच्या लकबीवरून वर्षानुवर्षे पान खाणाऱ्या एका बाई ने चोराला पकडले होते.त्याचे असे झाले, एक चोर स्री वेषभूषा करून रोज संध्याकाळी गप्पा मारत पान खात बसलेल्या स्रिया मध्ये जाऊन बसत असे. त्याला सोने नाणे मालमत्ते बद्दल माहिती काढायची असावी.थोडक्यात रेकी करण्यास येत असावा.एक दिवस पानाला चुना लावण्यासाठी त्याने चुना मागितला,आणि त्याने चुना अंगठ्याने काढल्यावर लगेच त्याला हटकले असता.पळण्याचा प्रयत्नात असताना सर्वांनी पकडला.त्या बाईंच्या मते डब्बीतून चुना काढताना पुरुष अंगठ्याचा वापर करतात आणि स्रिया बोटाचा.चला निरीक्षणाचा असाही फायदा झाला.

मागे भारत बांगलादेश युद्धात बांगलादेशने जेंव्हा भारतापुढे शरणागती स्वीकारली तेंव्हा बांगलादेशाच्या जनरलच्या विरोधात रहमान आयोगाने आरोप लावला कि "जनरल नियाजी कि पान बनाने मे ही अधिकतम उर्जा खर्च होती है|" तर असा हा पानाचा महिमा संपणार नाहीच.पुन्हा लिहीनच तूर्तास थांबते

तुझी लाडकी लेक मनिषा


मनीषा बेळगे ह्यांचे रविवारचे पत्र म्हणजे एक अनुभव असतो...एक सफर असते....वेगळ्या विश्वाची....त्यात फक्त एक रेसिपी मिळत नाही...तर वेगळ्या दुनियेची...माणसांशी...ओळख सुद्धा होते...तर...न संपणाऱ्या रात्रीची गोष्ट....

प्रिय आई,


साष्टांग प्रणाम गणपती विसर्जन झाले कि पाऊस हि जातो असे म्हणतात त्यानुसार आता पावसाळा संपून हिवाळा सुरु होईल. स्वेटर आणि आणखी गरम कपडे कपाटाबाहेर येतील. मग गरम कपडे, गरम सूप, भाजलेली मकाची कणसे,हुरडा खाण्याचे दिवस येतील. एकूण गुलाबी थंडीचे आगमन होईल.


ह्या सगळ्या गोष्टींची खूप आठवण येते. इकडे हि कडक उन्हाळ्यानंतर गुलाबी हिवाळा सुरु होईल.इथे हिवाळ्यात हटकून थोडाफार पाऊस पडतो. इतकाच काय तो बदल बाकी कधी कधी भयंकर धुके पडते.दिवसा ढवळ्या समोरचे काही दिसत नाही आणि गाड्यांचे अपघात होतात. तसा ऋतू मध्ये सहज बदल होतो.अगदीच नकळत.


अशा या गुलाबी हिवाळ्यात दिवस छोटा आणि रात्र मोठी होते. संपूर्ण हिवाळ्यात एक रात्र अशी येते ,अगदी वैऱ्याची रात्र म्हंटले तरी चालेल.संपता संपत नाही. इकडे साधारण डिसेंबर मध्ये हि रात्र येत असावी असा माझा अंदाज आहे. तशी हि वैऱ्याची रात्र मात्र ईरानी( फारसी ) लोकांमध्ये " शबे यलदा" म्हणून मोठ्या आनंदाने साजरी करतात.यलदा चा अर्थ जन्म घेणे असा होतो शब म्हणजे रात्र. "


ह्या सणासाठी ईराणी लोक आधीच जय्यत तयारीत असतात. या रात्रीच्या उत्सवासाठी सगळा परिवार एकत्र येऊन दस्तर खान सजवतो. सर्व प्रकारचे ड्राय फ्रुट्स आणि त्यापासून बनवलेले पारंपारिक पदार्थ तसेच ताजी फळे मुखत्वे टरबूज आणि डाळिंब ,अंगूर यांचा जास्त समावेश असतो. निरनिराळ्या खाद्य पदार्थ, पेय आणि टरबूज हमखास खातात. तसे तरी टरबूज खाण्यास डॉक्टर मनाई करतात पण ईराणी लोक ह्या रात्री टरबूज खाल्ल्याने पुढे थंडीचा मौसम असे पर्यंत सर्दी होत नाही असे मानतात.नौरोज इतकाच हा हि सण त्यांच्यासाठी मोठाच आहे. म्हणजे एकूण रात्रभर जागरण करून पहाटेचा सूर्य बघणे एकमेव हेतू असावा.


ह्या मोठ्या रात्रीनंतर दिवस थोडा थोडा वाढण्यास सुरवात होते म्हणून सूर्य जो कि सगळ्या सृष्टीला प्रकाशित करतो .त्याच्या स्वागतासाठी हि रात्र असावी. तसे आपणही कोजागिरी साजरी करतोच पण रात्रभर जागत नाहीत. उकळलेल्या दुधात चंद्राचे प्रतिबिंब पडले कि दुध पिऊन झोपून जातो. ईरानी (फारसी )लोकांचे तसे नाही. ही मंडळी रात्रभर जागतात, मैफिली जमतात.म्हातारी माणसे जुन्या गोष्टी सांगतात.शेर,शायर, दोहे, कविता झक्कास मैफिल जमते.जुन्या प्राचीन गोष्टी या दिवशी मुखोद्गत होत असाव्यात.


शेर वरून आठवले जुन्या काळात एक ईराणी कवी कासीम फिरदौसी याने जगातील सगळ्यात लांबलचक कविता लिहिली.त्यात ६० हजार शेर आहेत.आणि ते त्याने तब्बल त्याने ३५ वर्षे खर्चून लिहिलेत.त्या महान ग्रंथाचे नाव आहे " शाह्नामा",तसे जगात सगळ्यात मोठे आणि सर्वोत्तम खंड काव्य म्हणून महाभारतचाहि उल्लेख येतो.सांगण्याचा मुद्दा हाच कि जगात किती महान ग्रंथ घडवले गेलेत.


नाहीतर मी रेसिपी लिहितेय. तसा माझा काही महान ग्रंथ लिहिण्याचा मुळीच उद्देश नाही मी तुला पत्र लिहिण्यातच खुश आहे.या पत्रात तुला मी पर्शियन पुडिंग फिरणी ची रेसिपी सांगणार आहे. साहित्य - १ लिटर दुध, ८ टेबल स्पून साखर, २ टेबल स्पून तांदुळाचे पीठ, २ टेबल स्पून रोज वाटर, ४ चमचे पिस्ते ,इलायची पावडर . कृती - जाड बुडाच्या भांड्यात दुध उकळण्यास ठेवावे ,उकळी आल्यावर त्यात तांदुळाचे पीठ घालून सतत मिश्रण ढवळत राहावे,थोडे दाटसर वाटले कि त्यात साखर आणि रोज वाटर घालून साखर विरघळेपर्यंत हलवत राहावे.२ मिनटात फिरनी तयार वरून थोडी इलायची पावडर आणि पिस्त्याचे कप घालून थंड करण्यास ठेवावी. आणि थंडच सर्व करावी. कमी साहित्य आणि अत्यंत कमी वेळात पण स्वादिष्ट अशी फिरनी करून बघ..रेसिपी कशी वाटली कळव.

तूर्तास थांबते.

तुझी लाडकी लेक


मनिषा