माझा पहिला अभंग-
|| अज्ञानी मी पोर |गुरु विना ||
||जमा केली माया | जन्म गेला वाया
||उद्धार कराया| गुरु माझा ||
||उद्धार कराया| गुरु माझा ||
||येई डोळा पाणी | स्मरे गुरु वाणी ||
||यावे आठवांनी | गुरु राज ||
||तैरे अधांतरी|मी भवसागरी||
||न्यावे पैलतीरी | गुरु स्वामी ||
||कठोरता बरी | भेद नसे परी ||
||निर्मळ अंतरी | गुरुवर्य||
||नमन करिते | चरण पूजिते ||
||गुरूस स्मरते | पौर्णिमेशी ||
---मनिषा बांगर -बेळगे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा