------------------
कृष्णाने राधेशी केला एक वादा
अगदी खरा आणि साधासुधा
प्रेम आपले युगानुयुगे अमर राहील
हे जग माझ्या आधी तुझे नाव घेईल
माझ्या बासरीचे सूर जेंव्हा निघतील
फुले होऊन तुझ्यावर बरसतील
तुझे मला अखंड स्मरण राहील
तूला मज स्मरताना हे वृंदावन पाहील
ह्रदयात माझ्या तुझीच प्रतिमा राहील
राssधे राssधे करताना कृष्णच राधा होईल
--मनिषा बांगर -बेळगे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा